‘लोकसभा निवडणूक २०१४ मध्ये काँग्रेसला हरवण्यासाठी CIA-मोसादने कट रचला होता’, कुमार केतकर यांचा दावा

काँग्रेसचे माजी खासदार आणि नेते कुमार केतकर यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. कुमार केतकर म्हणाले आहेत की, “२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभूत करण्यासाठी अमेरिका आणि इस्रायलच्या गुप्तचर संस्था सीआयए आणि मोसादने कट रचला होता.” ते म्हणतात की, २०१४ मध्ये लोक मनमोहन सिंगांवर नाराज होते, “पण इतके नाराज नव्हते की पक्ष फक्त ४४ जागांवर घसरला.” बुधवारी संविधान दिनानिमित्त मुंबईत काँग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना ते असे म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना कुमार केतकर म्हणाले आहेत की, “२००४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने १४५ जागा जिंकल्या आणि पाच वर्षांनंतर २००९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत २०६ जागा जिंकल्या. जर विजयाचा हा ट्रेंड कायम राहिला असता तर २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस २५० जागा जिंकू शकली असती आणि सहजपणे सत्ता टिकवू शकली असती. मात्र या निवडणुकीत पक्षाला मोठा धक्का बसला. २०१४ मध्ये त्यांच्या जागा कमी झाल्या आणि त्या फक्त ४४ वर आल्या.”

ते म्हणाले, “तेव्हाच खेळ सुरू झाला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसने २०६ पेक्षा जास्त जागा जिंकू नयेत असा निर्णय घेण्यात आला होता.” त्यांनी असा दावा करतात की, “काही संघटना या विचाराने काम करत होत्या की, जोपर्यंत आम्ही काँग्रेसला २०६ पेक्षा कमी जागा देत नाही, तोपर्यंत आम्ही येथे (हिंदुस्थानात) आमचा खेळ खेळू शकणार नाही.”

केतकर म्हणाले की, “या संघटनांपैकी एक सीआयए होती आणि दुसरी इस्रायलची मोसाद. दोन्ही संघटना हिंदुस्थानात काहीतरी करण्याचा दृढनिश्चयी होत्या. जर स्थिर काँग्रेस सरकार किंवा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार पुन्हा सत्तेत आली असती तर, ते हिंदुस्थानात हस्तक्षेप करू शकणार नाहीत आणि त्यांची धोरणे अंमलात आणू शकणार नाहीत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)