लगीनघाई! नव्या वर्षात फेब्रुवारीपासून ‘शुभ मुहूर्त’

पुढील वर्षी लग्न करण्याचा विचार करणाऱ्या तरुणाईंसाठी शुभ मुहूर्ताची यादी समोर आली आहे. नवीन वर्षाची सुरुवात शुभ कार्यासाठी थोडी मंद असेल. याचे कारण म्हणजे जानेवारी महिन्यात मराठी पौष महिना असेल. या कारणांमुळे जानेवारीमध्ये लग्नाचा एकही शुभ मुहूर्त असणार नाही. मात्र फेब्रुवारी महिना सुरू होताच पुन्हा लग्नाचे शुभ मुहूर्त सुरू होतील. पंचांगानुसार, 2026 या संपूर्ण वर्षात एकूण 59 शुभ विवाह मुहूर्त असणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात 5, 6, 8, 10, 12, 14, 19, 20, 21, 24, 25, 26. मार्चमध्ये 1, 3, 4, 7, 8, 9, 11, 12. एप्रिलमध्ये 15, 20, 21, 25, 26, 27, 28, 29. मेमध्ये 1, 3, 5, 6, 7, 8, 13, 14. जूनमध्ये 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 29. जुलैमध्ये 1, 6, 7, 11. नोव्हेंबरमध्ये 21, 24, 25, 26, तर डिसेंबरमध्ये 2, 3, 4, 5, 6, 11, 12 या तारखांना शुभ मुहूर्त आहे.