
पुणे जिल्ह्यातील पुरंदर विधानसभा मतदारसंघातील विधानसभाप्रमुख शंकरनाना बबन हरपळे व उपजिल्हाप्रमुख अमोल अमृत हरपळे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने या दोघांची हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबतची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.


























































