लखनौमध्ये अडकलेले ठाण्यातील 16 विद्यार्थी सुखरूप परतले

लखनौमध्ये अडकलेले ठाण्यातील १६ विद्यार्थी आणि दोन शिक्षक आज सुखरूप परतले. विमानतळावर उतरल्यानंतर पालकांना बघून विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले. दुपारी साडेबारा वाजता मुंबई विमानतळावर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दरम्यान, दुहेरी संकटात सापडलेल्या विद्यार्थ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

स्काऊट गाईडच्या शिबिरासाठी ठाण्याच्या बेडेकर शाळेतील १६ विद्यार्थी लखनौमध्ये गेले होते. मात्र, परतीच्या प्रवासादरम्यान शुक्रवारी त्यांची ट्रेन चुकली, त्यानंतर खासगी बस कंपनीनेदेखील त्यांना फसवले. त्यामुळे त्या रात्री त्यांना धर्मशाळेत आश्रय घ्यावा लागला. पालकांपैकी एकाने ही बाब राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांना कळवली. त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांना तत्काळ सर्व सूत्रे हलविली. दरम्यान, १६ विद्यार्थी स्काऊट गाईडच्या शिबिरासाठी ठाण्याच्या बेडेकर शाळेतील १६ विद्यार्थी लखनौमध्ये गेले होते. मात्र आणि दोन शिक्षक विमानाने सुखरूप मुंबईत परतले.

शाळा प्रशासनावर पालकांची नाराजी
शिक्षकांच्या विश्वासावर विद्यार्थ्यांना पालकांना पाठवले होते. मात्र शुक्रवारपासून तिथेच अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रशासनाने हवे तसे प्रयत्न केले नसल्याने शाळा प्रशासनावर पाल कांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, मुलांच्या भेटीसाठी पालकांनी आज थेट मुंबई विमानतळ गाठले.