
पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलण्यात आले आहे. पीएमओ आता ‘सेवा तीर्थ’ म्हणून ओळखले जाईल. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा भाग म्हणून बांधल्या जाणाऱ्या नवीन पंतप्रधान कार्यालयाचे नाव ‘सेवा तीर्थ’ असे ठेवण्यात आले आहे. हे असे केंद्र आहे जिथे देशाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेतले जातात.
याबाबत माहिती देताना पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की, “सत्तेकडून सेवेकडे ही वाटचाल आहे. हे परिवर्तन प्रशासकीय नसून सांस्कृतिक आहे. सार्वजनिक संस्थांमध्ये मोठे बदल होत आहेत.”


























































