मुक्ताईनगरमध्ये मतदान केंद्राबाहेर राडा, भाजप-मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीदरम्यान मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. येथे मिंधे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांचे हे कार्यकर्ते असल्याचं सांगितलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचे वाहने समोरासमोर आल्यानंतर हा राडा झाल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यामुळे मतदान केंद्रांबाहेर मोठ्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.