
रेल कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या शिवसेनाप्रणित रेल कामगार सेनेमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. संघटनेच्या कार्याने प्रभावित होऊन मध्य रेल्वे मुंबई डिव्हिजनमधील कुर्ला डेपोमधील लोको रनिंग स्टाफच्या 50 लोको पायलट यांनी जाहीर प्रवेश केला.
रेल कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली रेल कामगार सेनेचे सरचिटणीस-शिवसेना उपनेते दिवाकर (बाबी) देव, कार्याध्यक्ष संजय जोशी यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या कार्याने प्रभावित होऊन तसेच रनिंग स्टाफप्रमुख प्रशांत कमानकर यांच्यावरील वाढत असलेल्या विश्वासामुळे कुर्ला डेपोतील लोको रनिंग स्टाफच्या 50 लोको पायलट यांनी रेल कामगार सेनेत जाहीर प्रवेश केला. यामध्ये लालन कुमार यांच्या नेतृत्वात दीपक कुमार यादव, जयशंकर पाल, शंकर कुमार गुप्ता, राजू कुमार सिंग, विक्रम कुमार, अमरजीत कुमार चौहान, शाकिर रज्जा, सतीश यादव, अनिल कुमार सहानी, अखिलेश कुमार सिंग, संतोष कुमार सिंग, मनीष कुमार सिंग, रणजित कुमार, रंजन कुमार, संजय कुशवाह, सतीश गुप्ता, राहुल नायक, मनजीत कुमार, विपीन पटेल, राहुल शर्मा, रजनीश कुमार सिंग, करणवेश आणि संपूर्ण बॅचचा समावेश होता. हा प्रवेश संयुक्त सरचिटणीस नरेश बुरघाटे, सहकार्याध्यक्ष योगेश जाधव, अर्जुन जामखिंडीकर, तिरुमलेश अंबाला, मल्हारी भटाटे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झाला.

























































