राज, सानिका राज्य खो-खो कर्णधार; राष्ट्रीय अजिंक्यपदासाठी कुमार-मुलींचा संघ जाहीर

राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील तेजस्वी कामगिरीच्या बळावर धाराशीवचा राज जाधव व सांगलीची सानिका चाफे यांची अनुक्रमे कुमार व मुली गटाच्या महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. येत्या 31 डिसेंबर 2025 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीत बंगळुरू, कर्नाटक येथे होणाऱया 44 व्या कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत हे दोन्ही संघ महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

महाराष्ट्राच्या संघातील खेळाडू

कुमार गट ः राज जाधव – कर्णधार, जितेंद्र वसावे, हाराद्या वसावे, सोत्या वळवी, विशाल वसावे (सर्व धाराशीव), शंभुराज चंदनशिव, अरमान शेख, सिद्धार्थ माने-देशमुख (सर्व सोलापूर), श्री दळवी, पार्थ देवकाते (सर्व सांगली), श्री वसावे, आदेश पाटील (सर्व पुणे), तरबेज खान (सातारा), आशीष गौतम (ठाणे), ओमकार चव्हाण (अहिल्यानगर), राखीव ः शंकर यादव (पुणे), समर्थ सावंत (मुंबई उपनगर), लोकेश जाधव (सातारा), प्रशिक्षक ः मोहन राजपूत (सोलापूर), सहा. प्रशिक्षक ः सुजित माळी (लातूर), व्यवस्थापक ः गणेश वारुळे (अहिल्यानगर). मुली गट ः सानिका चाफे – कर्णधार, श्रावणी तामखडे, विद्या तामखडे, सानिया सुतार (सर्व सांगली), धनश्री कंक, प्रणिती जगदाळे, दिक्षा काटेकर, श्रुती चोरमारे (सर्व ठाणे), मैथिली पवार, राही पाटील (सर्व धाराशीव), स्नेहा लामकाणे, प्राजक्ता बनसोडे (सर्व सोलापूर)नीलम मोहंडकर (नाशिक), श्वेता नवले (पुणे), दिव्या पायले (रत्नागिरी), राखीव ः कल्याणी लामकाणे (सोलापूर), सखुबाई चव्हाण (पुणे), सलोनी भोसले (सातारा), प्रशिक्षक ः अभिजित पाटील (धाराशीव), सहाय्यक प्रशिक्षक ः ऐश्वर्या सावंत (रत्नागिरी), व्यवस्थापिका ः उज्ज्वला चेमटे (अहिल्यानगर).