सरन्यायाधीशांवर बूट भिरकावणाऱ्या वकिलाला चपलेने मारले!

देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर भरकोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील किशोर तिवारी याला आज अज्ञात इसमाने न्यायालयाच्या आवारातच चपलेने बदडले. दिल्लीतील कडकडडुमा न्यायालयाच्या आवारात हा राडा झाला. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. मारहाण होत असताना तो ‘सनातन धर्म की जय’ अशा घोषणाही देत होता. याप्रकरणी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

…म्हणून मी तक्रार केली नाही!

राकेश किशोर याने पत्रकारांना याबाबत माहिती दिली. ‘35 ते 40 वर्षांच्या एका वकिलाने माझ्यावर चपलेने हल्ला केला. माजी सरन्यायाधीशांवर बूट फेकल्याची ही शिक्षा असल्याचे हल्लेखोर म्हणत होता. तो वकील होता. माझा व्यवसाय बंधू होता. हा अंतर्गत मामला आहे. त्यामुळे तक्रार दाखल केली नाही, असे किशोर याने सांगितले.