राजकीय हस्तक्षेपामुळे सेस इमारती,चाळींच्या पुनर्विकास रखडला; आदित्य ठाकरे यांचा हल्ला

मुंबईतील सेस इमारती, चाळी आणि पागडी सिस्टीमचा पुनर्विकास राजकीय हस्तक्षेप, लँडलॉर्ड लॉबीमुळे रखडल्याचा हल्ला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आणि शिवसेना विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत बोलताना केला. यामुळे चाळी, सेस इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांची गैरसोयींमुळे बिकट अवस्था झाली असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे सरकारने यात लक्ष घालून पुनर्विकासाचा तिढा सोडवावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

संबंधित घरांची लॉटरी नियमाप्रमाणे होत नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. राजकीय लोक अधिकाऱ्यांवर दबाव टाकत आहेत. त्या ठिकाणी जातीय व सामाजिक तेढ निर्माण करीत आहेत. याला पायबंध घालण्याची मागणीही आदित्य ठाकरे यांनी आज विधानसभेत केली आपण 79 – ए, बीच्या माध्यमातून अशा घरांचा पुनर्विकास सुरू केला. मात्र कुणीतही कोर्टात गेल्यामुळे पुढील प्रक्रिया थांबली. बीडीडीमध्ये अशाप्रकारे यशस्वी पुनर्विकास केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र अशा प्रकरणांत आता यामध्ये लँडलॉर्ड लॉबी, राजकीय हस्तक्षेप वाढल्याने लाखो लोकांचा पुनर्विकास रखडल्याचे ते म्हणाजे.

n वरळीतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा पहिला टप्पा होऊन आता इमारत उभी राहिलेली आहे. पण घरांची लॉटरी शासनाच्या नियमाप्रमाणे झाली पाहिजे. लॉटरीमध्ये नियम मोडून राजकीय हस्तक्षेप टाळावा अशी मागणीही त्यांनी केली, जेणेकरून लॉटरी प्रक्रिया पारदर्शक पद्धतीन पार पडेल, असे त्यांनी एक्सवर म्हटले आहे.