१३ सायबर चोर रायगड पोलिसांच्या जाळ्यात

सायबर गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी रायगड पोलिसांनी ठोस पावले उचलली आहेत. रायगड जिल्ह्यात जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत सायबर क्राईमच्या माध्यमातून आर्थिक फसवणुकीचे ८ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये सायबर गुन्हेगारांनी २ कोटी २७ लाख ८२ हजार ६०९ रुपयांचा डल्ला मारला होता. या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी १३ आरोपींना अटक केली असून २ कोटी ६२ हजार ९१२ रुपये जप्त केले आहेत.

सायबर क्राइमचे गुन्हे रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात सायबर सेल स्थापन करण्यात आला आहे. तसेच सायबर क्राइमसंबंधी वाढते गुन्हे लक्षात घेऊन अशा प्रकारच्या गुन्ह्यांसंबंधी तपास करण्यासाठी जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात येत आहे. मागील ११ महिन्यांत सायबर क्राइम माध्यमातून हसवणुकीचे ८ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये त्यातील २ कोटी २७ लाख ८२ हजार ६०८ रुपयांची फसवणूक करण्यात आले आहे. यामधील २ कोटी ६२ हजार ९१२ रुपये आरोपींकडून पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे. डिजिटल आर्थिक गुन्ह्यात वसूल केलेली रक्कम बँकांमध्ये जमा होते ती रक्कम न्यायालयाच्या आदेशाने संबंधित व्यक्तीला परत केली जाते.

११ महिन्यांत २ कोटी ६२ हजार जप्त सोशल साईटस्च्या माध्यमातून तरुण, तरुणींना ब्लॅकमेल. नोकरी, विवाहविषयक साईटस्वरून फसवणूक. ई-मेलवर माहिती मागवून आर्थिक फसवणूक.
बँकेतून फोन केल्याची बतावणी करत फसवणूक.

नागरिकांची बेफिकिरी कारणीभूत
अनोळखी माणसांना आपल्या एटीएमचा नंबर देऊ नका, असे आवाहन पोलीस, बँका करतात. मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष करून नागरिक आपला नंबर अनोळखी लोकांना देतात. यामुळे सायबर चोर काही क्षणात नागरिकांचे बँक खाते साफ करतात. याशिवाय सोशल नेटवर्किंग साईटवर चॅटिंग करणेही महागात पडते.