
अमेरिकेतील हिंदुस्थानी संस्थापक हरीश उथयकुमार यांनी तीन लाख सबस्क्राइबर्स असलेल्या एका सुरक्षारक्षकाची एक अनोखी गोष्ट शेअर केली. सुरक्षारक्षकाच्या ‘यूटय़ूब’ चॅनेलची गोष्ट त्यांनी कॅप्शनमध्ये सविस्तर लिहिली आहे. हरीश यांनी लिहिलंय की, ‘आज मला कळले की, आमच्या सुरक्षा रक्षकाचे युटयुबवर तीन लाख सबस्क्राइबर्स आहेत. त्याने 14 वर्षांचा असताना कोविडदरम्यान ‘यूटय़ूब’वर बंगाली स्किट्स बनवायला सुरुवात केली. जर मला कधी बंगाली जाहिराती कराव्या लागल्या तर मी या माणसाला नक्की घेईन’; अशी कॅप्शन हरीश यांनी व्हिडीओला दिली आहे. ही पोस्ट @curiousharish या ‘एक्स’ अकाऊंटवरून शेअर केली आहे. हा सुरक्षरक्षक चांगलाच वायरल होत आहे.




























































