‘एआय प्रोजेक्ट’मध्ये सहा लाख कोटी गुंतवणार

जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) कडे कंपन्यांनी आपला फोकस वळवला आहे. गुगल, मेटा, मायक्रोसॉफ्ट आणि ऍमेझॉन या चार प्रमुख कंपन्या हिंदुस्थानात तब्बल सहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिकन थिंक टँक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन फाऊंडेशनच्या अहवालानुसार, जागतिक सेमीकंडक्टर डिझाइन वर्कफोर्सचा 20 टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा हिंदुस्थानात आहे. ऍमेझॉनची हिंदुस्थानातील गुंतवणूक 3.6 लाख कोटींपर्यंत पोहोचली आहे. मेटाने 900 कोटी, मायक्रोसॉफ्टने 1.57 लाख कोटी, तर गुगलने 1.35 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे.