टाटा सियाराला टक्कर, महिंद्राची नवी एसयूव्ही येतेय

टाटा मोटर्सने काही दिवसांपूर्वीच नवी एसयूव्ही सियारा लाँच केली आहे. टाटाच्या सियाराला टक्कर देण्यासाठी महिंद्रा कंपनी नवीन एसयूव्ही लाँच करणार आहे. येत्या 5 जानेवारी 2026 ला ही एसयूव्ही लाँच केली जाणार असून या एसयूव्हीचे नाव एक्सयूव्ही 7एक्सओ असे असणार आहे. महिंद्राने या कारचा एक टीझरसुद्धा प्रदर्शित केला आहे. महिंद्राच्या या नव्या एसयूव्हीमध्ये मजबूत इंजिन आणि नवीन फीचर्स मिळणार आहेत. महिंद्राच्या या कारमध्ये पेट्रोल आणि डिझेल असे दोन इंजिन मिळणार आहे. या दोन्ही इंजिनमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्सचा पर्याय मिळेल.