‘श्रीमद्भगवद्गीता-संगीतामृत’ पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन बोरीवलीत होणार सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. दत्तोपंत पटवर्धन बुवा यांच्या प्रेरणेने साठ वर्षांपूर्वी दिवंगत सीताराम गणपती मणेरकर यांनी रचलेल्या ‘श्रीमद्भगवद्गीता-संगीतामृत’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा सोमवार, 15 डिसेंबर रोजी सुप्रसिद्ध शास्त्राrय, भक्तिगीत गायक संगीतकार अजित कडकडे यांच्या हस्ते होणार आहे. प्रबोधन मिनी थिएटर, बोरिवली येथे दुपारी 4 वाजता हा सोहळा होईल.

‘श्रीमद्भगवद्गीता-संगीतामृत’ पुस्तकात महाकाव्य गीतेतल्या 18 अध्यायांमधील संस्कृत श्लोकांचा सहज सोप्या भाषेत अनुवाद करण्यात आला आहे. पुस्तकात भगवद्गीतेमधील अध्याय जुन्या अविस्मणीय नाटय़गीतांच्या चालीत रचल्याची संपूर्ण माहिती पद, चाल, ताल आणि रागासह देण्यात आली आहे. या कार्यक्रमाला कुमुद विद्यामंदिरच्या संस्थापक माजी मुख्याध्यापिका आणि शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त मीना पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यात माणिक वर्मा यांच्या ज्येष्ठ शिष्या विदुषी अर्चना कान्हेरे पुस्तकातील काही पदे सादर करतील. त्यांना ऑर्गनवर वरद सोहनी, संवादिनीवर तन्मय मेस्त्राr आणि तबल्यावर सौरभ कानुलकर साथ देतील. हा सोहळा सर्व रसिकांसाठी खुला असून रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.