
शेअर बाजार किंवा कमोडिटी मार्पेटमध्ये नव्हे तर क्रिप्टो मार्पेटमध्ये मोठा हाहाकार उडाला आहे. जगातील सर्वात मोठे क्रिप्टो करन्सी असलेल्या बिटकॉईनचे मूल्य सतत घसरत आहे. बिटकॉईनचे मूल्य 90 हजार डॉलरच्या खाली पोहोचले. त्याचा परिणाम एकूण क्रिप्टो करन्सी मार्पेटवर दिसून येत आहे. मागील 24 तासांत क्रिप्टो करन्सी मार्पेटमध्ये 12 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 15 डिसेंबर रोजी बिटकॉईनची किंमत 0.60 टक्के घसरणीसह 89608 डॉलर एवढी राहिली. त्यामुळेच क्रिप्टो करन्सी मार्पेटमध्ये 130 अब्ज डॉलर म्हणजे 12 लाख कोटी रुपये एवढी घसरण झाली. सकाळच्या सत्रात जगातील सर्वात मोठी क्रिप्टो करन्सी बिटकॉईन 87996 डॉलरपर्यंत खाली आली आणि पुन्हा 89923 च्या उच्च स्तरावर पोहोचली.
क्रिप्टो मार्पेटवर दबाव
डेल्टा एक्स्चेंजचे रिसर्च अॅनालिस्ट रिया सहगल यांच्या माहितीनुसार, तब्बल 116000 ट्रेडर्सनी आपले व्यवहार थांबवले. क्रिप्टो मार्पेट हे पाश्चात्य ग्लोबल मार्पेटमधील मंदी आणि आशियाई मार्पेटच्या दबावाखाली आहे. पश्चिमेकडील पेंद्रीय बँकांनी व्याजदरात कपात केली तर परिस्थिती आशाजनक होऊ शकते. ब्रिटनच्या अर्थ मंत्रालयाने क्रिप्टो नियमांची घोषणा केली आहे.



























































