ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनचे अधिवेशन

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनशी संलग्न ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनचे 9वे अखिल भारतीय अधिवेशन 27 व 28 डिसेंबर रोजी पुण्यातील शिवाजीनगर येथील दादासाहेब दरोडो सभागृहात होणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्राच्या विविध शाखांतून 500 प्रतिनिधी अधिवेशनात सहभागी होणार आहेत.

अधिवेशनाचे उद्घाटन 27 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 मिनिटांनी कॉ. सी. एच. वेंकटचलम यांच्या हस्ते होईल. बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ निधू सक्सेना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. यावेळी पद्मश्री सुचेता दलाल यांना द्वितीय कॉ. सुरेश धोपेश्वरकर हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल. व्ही. सी. जोशी, कॉ. कृष्णा बरुरकर, कॉ. एन. शंकर, कॉ. ललिता जोशी यावेळी उपस्थित राहतील. 28 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कामगार वर्ग ः संधी, आव्हाने आणि पुढील वाटचाल’ या विषयावर आयटी तज्ञ अच्युत गोडबोल मार्गदर्शन करतील, अशी माहिती फेडरेशनचे सरचिटणीस देविदास तुळजापूरकर यांनी दिली.