
टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू शार्दुल ठाकूर हा बाबा झाला आहे शार्दुलची पत्नी मितालीने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. शार्दुलने एक पोस्ट शेअर करत त्याला मुलगा झाल्याची गुड न्यूज दिली आहे.
View this post on Instagram
शार्दुल ठाकूर व मिताली पारूलकर यांनी 27 फेब्रुवारी 2023 मध्ये लग्न केले. मिताली गरोदर राहिल्यानंतर शार्दुलने तिच्यासोबतचे फोटो शेअर करत त्यांच्याकडे गुड न्यूज असल्याचे सांगितले होते. . शार्दुल ठाकूर सध्याच्या घडीला देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे.
शार्दुल हा 2026 च्या मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. मुंबईने त्याला रिटेन केले आहे. मुंबई इंडियन्सनने देखील पोस्ट शेअर करत शार्दुल व मिताली यांनी ज्युनियर ठाकूरच्या आगमनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
























































