आम्ही हिंदुस्थानातले सर्वात मोठे पळपुटे, ललित मोदी व विजय मल्ल्याने हसत हसत दिली कबूली

देशाला कोटय़वधी रुपयांचा चुना लावून परदेशात परागंदा झालेला उद्योगपती विजय मल्ल्या आणि आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत हे दोघेही अत्यंत निर्लज्जपणे आम्ही हिंदुस्थानातील सर्वात मोठे फरार पळपुटे असल्याची कबूली दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lalit Modi (@lalitkmodi)

बँकेला हजारो कोटी रुपयांचा चुना लावून परदेशात पळून गेलेल्या विजय मल्ल्याच्या 70 व्या वाढदिवसाची पार्टी आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी लंडन येथील स्वतःच्या घरी ठेवली. या बर्थ डे पार्टीला अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. या पार्टीचे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातील एका व्हिडीओत ललित मोदी हसत हसत ‘आम्ही दोघे हिंदुस्थानातील सर्वात मोठे पळपुटे लोकं आहोत”, असे सांगताना दिसत आहेत.

ललित मोदीने स्वत: हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून विजय मल्ल्या व ललित मोदी हे हिंदुस्थानच्या सरकारची खिल्ली उडवत आहेत असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.