लोककलेचा जागर – सांस्कृतिक ओळखीचे जतन

महाराष्ट्रातील लोककला हा ग्रामीण जीवनाचा आत्मा मानला जातो आणि त्यांचे संवर्धन, जतन आणि पुनरुज्जीवन अत्यंत महत्त्वाचे आहे. दशावतार, मेळे, नमन आणि भारूड या लोककलांनी समाजाला केवळ मनोरंजनच दिले नाही, तर संस्कार, श्रद्धा आणि सामाजिक संदेशही दिले आहेत. कोकणात प्रचलित असलेला दशावतार असो किंवा नमन ही देवतेच्या स्तुतीसाठी सादर केली जाणारी भक्तिनाटय़पर कला असो हे सगळे नाटय़प्रकार जपले पाहिजेत. ही सामूहिक सादरीकरणाची परंपरा असून उत्सव, यात्रा आणि जत्रांमध्ये ही लोकांना एकत्र आणण्याचे आणि समाज बांधण्याचे काम करते.

आजही ग्रामीण भागात सादर होत असलेले हे कलाप्रकार नव्या पिढीला परंपरेशी जोडण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहेत. आधुनिकतेच्या काळातही या लोककला जपणे, वाढवणे आणि शहरात वसलेल्या चाकरमान्यांसाठी त्यांचे महानगरात प्रयोग करणे हे मोठे काम करणारी मंडळी आपल्यात आहेत. विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात रविवार, 11 जानेवारी रोजी ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ हा असाच एक कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी संपर्क ः चंद्रकांत मुरमुरे 9322319683