
मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाने धीरूभाई अंबानी ऑक्युपेशनल हेल्थ (डीएओएच) आणि कम्युनिटी मेडिकल सेंटर, जामनगर यांच्या सहकार्याने टेलि रोबोटिक सर्जरी प्रोग्रॅम सुरू केला आहे. या उपक्रमाद्वारे रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर एकाच ठिकाणी बसून दूरवरच्या रुग्णालयातील डॉक्टरांना मार्गदर्शन तसेच रोबोटिक सर्जरी करू शकतील.
आजवर गंभीर आजारावरील उपचार केवळ शहरात उपलब्ध होते. या उपक्रमामुळे गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आता रुग्णांना मोठय़ा शहरात जाण्याची गरज भासणार नाही. नुकतीच या उपक्रमाअंतर्गत पहिली रोबोटिक सर्जरी जामनगर येथे यशस्वीरीत्या करण्यात आली.




























































