तुम्ही जनावरा सारखे वागताय, भर कार्यक्रमात चाहत्यांच्या गोंधळानंतर कैलास खेर भडकले

kailash kher

प्रसिद्ध गायक कैलास खेर गायक यांचा ग्वालियर येथे गाण्यांचा लाईव्ह शो सुरू असताना अचानक चाहत्यांनी गोंधळ घातला. काही चाहते कैलास खेर यांना पाहण्यासाठी बॅरिगेट्सवरून उड्या मारून स्टेजजवळ येत होते. ते पाहून कैलास खेर भडकले व त्यांनी चाहत्यांना खडे बोल सुनावले.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त ग्वालियर येथे कैलाश खेर यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. कैलाश खेर यांची गाणी सुरू असताना अचानक चाहते बॅरिगेट ओलांडून स्टेजजवळ येऊ लागले. सुरुवातीला आयोजकांनी माईकवरून आवाहन करत त्यांना थांबण्यास सांगितले मात्र चाहते थांबत नसल्याने कैलास खेर यांनी स्वत: त्यांना विनंती केली.

मात्र चाहते ऐकत नसल्याने कैलास खेर भडकले व ते म्हणाले की, जर कुणीही स्टेजजवळ आले आणि आमच्या वाद्यांना हात लावला तर आम्ही हा कार्यक्रम तत्काळ थांबवेन. आम्ही तुमचा सन्मान राखत होतो पण तुम्ही जनावरा सारखे वागत आहात, अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतरही चाहते ऐकत नसल्याने कैलास खेर यांनी कार्यक्रम थांबवला व ते आपल्या टीमला घेऊन तिथून निघून गेले.