
पंतप्रधान कौशल्य विकास योजनेतील घोळ समोर आला आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेतलेले 94 टक्के लाभार्थी प्रत्यक्षात अस्तित्वातच नसल्याचे ताशेरे ‘कॅग’च्या 2025 च्या अहवालात ओढण्यात आले आहेत. त्यामुळे योजनेच्या नावाखाली 94 टक्के तरुणांना दिलेले कोटय़वधी गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 2015 मध्ये ही योजना सुरू झाली. आतापर्यंत 14 हजार कोटी वितरित केले. याचा 1 कोटी 32 लाख तरुणांना फायदा झाल्याचा दावा आहे.
कौशल्य विकास केंद्रांना टाळे
‘कॅग’च्या पाहणीत काही राज्यांत कौशल्य विकास केंद्रांना टाळे असल्याचे आढळले. केंद्रात हजेरीसाठी आधारशी संलग्न बायोमेट्रिक मशीन सक्तीचे होते, मात्र अनेक केंद्रांत ते बसवलेलेच नाही.
‘कॅग’च्या अहवालात काय?
तब्बल 90 लाख 66 हजार 264 लाभार्थ्यांचे बँक अकाऊंट नंबरच नाहीत.
साडेतीन लाख लाभार्थ्यांचे बँक अकाऊंट नंबर बनावट आहेत.
36 टक्के लाभार्थ्यांचे ई-मेल चुकीचे. 131 लाभार्थ्यांचा एकच ई-मेल
अनेक लाभार्थ्यांचे पह्न नंबर चुकीचे, अकाऊंट नंबर एकसारखेच आहेत.
111111111, 123345, ABCD असे लाभार्थ्यांचे अकाऊंट नंबर आहेत.
एकच फोटो वापरून वेगवेगळय़ा राज्यांतील पेंद्रांवर प्रशिक्षण घेतल्याचे दाखवण्यात आले आहे.





























































