
हिरड्यांमधून रक्त येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यासाठी तुमच्या काही सवयींमध्ये बदल करा.
कडक ब्रश वापरणे बंद करा आणि मऊ किंवा अति मऊ ब्रश वापरा.
दात घासताना जास्त जोर लावू नका. हलक्या हाताने आणि गोलाकार पद्धतीने ब्रश करा.
दिवसातून एकदा दातांच्या फटींमधील घाण काढण्यासाठी फ्लॉसचा (पातळ धागा) वापर करा, जेणेकरून तिथे जंतू साठणार नाहीत.
जिभेवर साठलेले बॅक्टेरिया हिरड्यांच्या आरोग्यावर परिणाम करतात. त्यामुळे जीभ नियमित स्वच्छ ठेवा





























































