
ICC Under 19 World Cup 2026 साठी टीम इंडियाच्या 15 शिल्लेदारांची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या फलंदाजीने गोलंदाजांना घायाळ करणाऱ्या वैभव सूर्यवंशीची सुद्धा संघात निवड झाली आहे. त्यामुळे त्याची हीच तोडफोड आणि तडाखेबंद फटकेबाजी पाहण्यासाठी चाहते सुद्धा उत्सुक आहेत. 15 जानेवारी पासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत मराठमोळ्या आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. तसेच विहान मल्होत्राच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
नामेबिया आणि झिम्बाब्वेमध्ये 15 जानेवारी पासून 19 वर्षांखाली तरुण खेळाडूंची लढाई सुरू होणार आहे. टीम इंडियाचा समावेश ग्रुप ए मध्ये करण्यात आला आहे. ग्रुप ए मध्ये टीम इंडियासोबत न्यूझीलंड, अमेरिका आणि बांगलादेश या संघांचा समावेश आहे. टीम इंडियाचा साखळी फेरीतील पहिला सामना 15 जानेवारी रोजी अमेरिकाविरुद्ध होणार आहे. तर दुसरा सामना 17 जानेवारी रोजी बांगलादेशविरुद्ध आणि साखळी फेरतीली तिसरा आणि शेवटचा सामना 24 जानेवारी रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळला जाणार आहे. टीम इंडियाचे साखळी फेरतीली सर्व सामने बुलावायो येथील क्वींस स्पोर्ट क्लब येथे होणार आहेत. टीम इंडियाने यापूर्वी आतापर्यंत पाच वेळा 19 वर्षांखालील वर्ल्ड कप उंचावला आहे. त्यामुळे वर्ल्ड कप विजतेपदाचा षटकार मारण्यासाठी संघ मैदानात उतरेल.
🚨 News 🚨
India’s U19 squad for South Africa tour and ICC Men’s U19 World Cup announced.
Details▶️https://t.co/z21VRlpvjg#U19WorldCup pic.twitter.com/bL8pkT5Ca2
— BCCI (@BCCI) December 27, 2025
टीम इंडियाचा संघ
आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, एरॉन जॉर्ज, वेदांत्र त्रिवेदी, अभिग्यान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंश सिंग (यष्टीरक्षक), आर.एस अंबरीश, कनिष्क चौहान, खिलान पटेल, मोहम्मद एनान, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन, किशन कुमार सिंग, उदव मोहन



























































