
अलिकडे आपल्या दैनंदिन जीवनात ईसिगारेटचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. अनेकांच्या मते ईसिगारेट धु्म्रपानापेक्षा कमी धोकादायक आणि शरीरावा कमी नुकसान पोहोचवणारी आहे. त्याचा शरिरावर कोणताही गंभीर परिणाम होत नाही. मात्र तसे तुम्हालाही वाटत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एका महिलेने ईसिगारेटचा अतिवापर केल्याने तिच्या दृष्टीवर परिणाम झाला आहे.
नेत्रतज्ज्ञ मेघा कर्णवत यांनी इंस्टाग्रामवर याबाबत माहिती शेअर केली आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, एका 40 वर्षाच्या महिलेला आधी रक्तदाब किंवा मधुमेहाचा त्रास नव्हता. मात्र तरीही रात्री जास्त ईसिगारेट प्यायल्याने सकाळी तिच्या डोळ्याची दृष्टी गेली. त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे, डॉक्टरांनी लोकांना व्हेपिंगच्या धोकादायक दुष्परिणामांबद्दल शिक्षित करण्याचा प्रयत्न केला.
ईसिगारेटमध्ये तंबाखूसारखे बिडी आणि सिगारेटसारखे धूम्रपान करणारे पदार्थ नसतात, तर ते इलेक्ट्रॉनिक उपकरण असते. या उपकरणांमध्ये एक द्रव असतो जो गरम केल्यावर धुक्यात बदलतो ज्यामध्ये लहान कण असतात, जे लोक श्वास घेतात, ज्यामुळे त्यांना धूम्रपानासारखेच वाटते. व्हेपिंग उपकरणांमध्ये असलेले द्रव सामान्य पाणी नसते, जे गरम केल्यावर बाष्पीभवन होते, तर त्यात निकोटीन आणि आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या अनेक रसायनांचे कण असतात. अनेक अहवालांनुसार, व्हेपिंगला सिगारेटपेक्षा जास्त धोकादायक असे बोलले जाते.
View this post on Instagram
अहवालांनुसार, व्हेपिंगमुळे डोळ्यांवर गंभीर दुष्परिणाम होतात, ज्यापैकी मुख्य म्हणजे डोळे कोरडे पडणे. डोळ्यांना संरक्षणासाठी अश्रूंची आवश्यकता असते, जे त्यांना ओलसर ठेवतात.व्हेपिंग किंवा धूम्रपान या प्रक्रियेत व्यत्यय आणते, ज्यामुळे सतत जळजळ आणि खाज सुटते. व्हेपिंग किंवा धूम्रपानामुळे डोळ्यांमध्ये मोतीबिंदूची समस्या येणे देखील सामान्य आहे, कारण सिगारेट ओढणे आणि धूम्रपान केल्याने डोळ्यांच्या लेन्सला नुकसान होते आणि धुराच्या प्रभावामुळे डोळे कमकुवत होतात, ज्यामुळे व्यक्तीला अंधुक दिसू लागते.
व्हेपिंगमुळे या समस्या उद्भवू शकतात
डोळ्याच्या पडद्याकडे रक्तपुरवठा करणाऱ्या धमनी तात्पुरता किंवा कायमस्वरूपी आकुंचन होणे. म्हणजे अंधुक दिसणे.
ऑप्टिक नर्व्हमध्ये रक्त प्रवाह कमी होणे.
रेटिनल टिश्यूजमध्ये वाढलेला ऑक्सिडेटिव्ह ताण
व्यक्ती तरुण आणि निरोगी असली तरीही अचानक दृष्टी कमी होणे.






















































