लोकल प्रवासात मुंबईकरांची रखडपट्टी

उपनगरी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी लोकल ट्रेनच्या वेळापत्रकाचा बोजवारा उडाला. मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर लाईनवर ब्लॉकमुळे लोकलसेवा विस्कळीत झाली. अप आणि डाऊन मार्गावरील सर्वच गाडय़ा उशिराने धावल्या. तसेच पश्चिम रेल्वेच्या अप मार्गावरील लोकल ट्रेन जवळपास 30 ते 40 मिनिटे विलंबाने धावल्यामुळे प्रवाशांची रखडपट्टी झाली.

मध्य रेल्वेने रविवारी माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर ब्लॉक घेतला होता. त्यामुळे सर्व जलद आणि धिम्या लोकल धिम्या ट्रकवरूनच चालवण्यात आल्या. या गोंधळात अनेक गाडय़ा रद्द कराव्या लागल्या. परिणामी, रविवारच्या सुट्टीत फिरायला बाहेर पडलेल्या प्रवाशांचे हाल झाले.