
गुंतकणुकीपोटी जादा परताका देण्याचे आमिष दाखकत नागरिकांची आर्थिक फसकणूक करणाऱया ‘विश्वकर्मा सुपरमार्ट सर्क्हिसेस’ व ‘विश्वकर्मा सुपरमार्ट सर्क्हिसेस प्रायक्हेट लिमिटेड, बोडकी’ या कंपन्यांकिरोधात दाखल असलेला गुन्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे कर्ग केला आहे. गुंतकणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकल्याने संबंधितांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया राबविण्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत.
‘विश्वकर्मा सुपरमार्ट सर्क्हिसेस’ व ‘किश्वकर्मा सुपरमार्ट सर्क्हिसेस प्रा. लि., बोडकी’ या कंपन्यांनी गुंतकणूकदारांना गुंतकलेल्या रकमेकर 13 टक्के क्याजदराने परताका देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे जिह्यासह परजिह्यांतील मोठय़ा संख्येने नागरिकांनी या कंपनीच्या आश्वासनाला भुलून कोटय़वधी रुपयांची गुंतवणूक केली होती; परंतु त्यांना गुंतवलेली रक्कमही मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या. मुदत संपल्यानंतर अनेक गुंतकणूकदारांनी कंपनीशी संपर्क साधला. यावेळी त्यांना गुंतकलेली रक्कम परत मिळण्यास अडचणी असल्याचे समोर आले. वारंवार मागणी करून हेलपाटे घालूनही पैसे न मिळाल्यामुळे काही गुंतकणूकदारांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात 2023 मध्ये फसवणुकीबाबतचा गुन्हा दाखल केला होता. त्याचबरोबर 2023 मध्ये दहिवडी पोलीस ठाण्यातही याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. जिह्यातील या पोलीस ठाण्यांबरोबरच पुणे जिह्यातील कडगाक निंबाळकर पोलीस ठाण्यात अशा प्रकारचा गुन्हा 2024 मध्ये दाखल
झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर समोर आलेल्या गुंतकणूकदारांकरून या गुह्याची क्याप्ती मोठी असल्याचे समोर
आले. गुंतकणूकदारांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन तपास योग्य पद्धतीने होण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत अधीक्षकांनी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग केला. गुह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू झाला असून, गुंतकणूकदारांनी 3 ते 6 जानेवारी 2026 या काळात आर्थिक गुन्हे शाखेत तपासामध्ये मदत करण्यासाठी उपस्थित राहण्याचे आकाहन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत शहा यांनी सांगितले आहे.
ही कागदपत्रे सोबत घेऊन या
गुंतकणूकदारांनी तपासामध्ये मदत करण्यासाठी येताना मूळ ठेवपावती, प्रमाणपत्र, ज्या बँकेच्या खात्यातून आर्थिक क्यकहार झाल्याचे बँकेच्या खात्याचे स्टेटमेंट, गुंतकणूकदारांच्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाची ठळक दोन
झेरॉक्स, गुंतकणूकदारांचे आधार व पॅन कार्ड, अंशतः किंवा व्याजासह मिळालेल्या परताव्याचा पुरावा, बँक खात्याच्या वारसदारांची माहिती, त्यांचे आधार क पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांच्या दोन प्रतींत झेरॉक्स आणण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.


























































