
चोरटय़ाने मंदिरातील दानपेटय़ा फोडून रक्कम पळवल्याची घटना कांदिवली आणि कुरार परिसरात घडली. या प्रकरणी कांदिवली आणि कुरार पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
कांदिवली येथे एक मंदिर आहे. त्या मंदिरात तक्रारदार हे ट्रस्ट सदस्य आहेत. त्या मंदिरात दोन पुजारी हे मंदिर उघडणे आणि बंद करण्याचे काम करतात. मंदिरात एक पेटी ठेवली आहे. ती पेटी दर तीन महिन्यांनी उघडली जाते. गेल्या आठवडय़ात पुजारी नेहमीप्रमाणे मंदिरात आले तेव्हा त्यांना मंदिराची दानपेटी फुटलेल्या अवस्थेत दिसली. पुजाऱयाने याची माहिती तक्रारदारांना दिली. चोरटय़ाने दानपेटीचे टाळे तोडून त्यातील 50 हजार रुपये चोरून पळ काढला. घडल्या प्रकरणी त्याने कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. कांदिवली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
तर दुसरी घटना मालाडच्या कुरार येथे घडली. कुरारगाव येथे एक मंदिर आहे. त्या मंदिरात तक्रारदार हे उपसचिव म्हणून काम करतात. मंदिरातील दानपेटी महिन्याच्या पहिल्या रविवारी उघडली जाते. त्या मंदिराच्या पेटीमध्ये महिन्याला अंदाजे 50 हजार रुपये दान स्वरूपात जमा होतात. शनिवारी पहाटे मंदिरातील कर्मचारी यांनी तक्रारदार याना पह्न केला. मंदिरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. शनिवारी पहाटे दोन जणांनी मंदिरात प्रवेश केला. चोरटय़ाने लोखंडी हत्याराच्या सहाय्याने दानपेटी पह्डली. दानपेटीतील 45 हजार रुपये चोरटय़ाने लांबवले. घडल्या प्रकरणी त्याने कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कुरार पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.


























































