
महापालिका निवडणुकीसाठी सोमवारी २९ प्रभागांमधून १९१ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यात विविध राजकीय पक्षांच्या नावाने १५३ उमेदवारांनी आणि ३८ जणांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचा उद्या मंगळवार शेवटचा दिवस आहे.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवार हा पाचवा दिवस आहे. आजच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वच नऊ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उमेदवारांची गर्दी झाली होती. उमेदवारी अर्ज सादर करताना सोबत अनुमोदक आणि सूचक अशा दोन जणांना उमेदवारांनी आपल्या सोबत आणले होते. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दुपारी ३ वाजेपर्यंत वेळ देण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी-१ यांच्याकडे १० उमेदवारी अर्ज दाखल झाले असून त्यात ६ राजकीय पक्षांतर्फे, तर ४ अपक्ष. निवडणूक निर्णय अधिकारी-२ यांच्याकडे २५ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी २० राजकीय पक्षांतर्फे तर ५ अपक्ष. निवडणूक निर्णय अधिकारी-३ यांच्याकडे २३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून त्यात १८ राजकीय पक्षांचे उमेदवार आणि ५ अपक्ष.
निवडणूक निर्णय अधिकारी-४ यांच्याकडे २५ उमेदवारी अर्ज भरण्यात आले असून त्यापैकी २२ राजकीय पक्षांचे उमेदवार म्हणून तर ३ अपक्ष. निवडणूक निर्णय अधिकारी-५ यांच्याकडे १६ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी १० राजकीय पक्षांतर्फे तर ६ अपक्ष. निवडणूक निर्णय अधिकारी-६ यांच्याकडे ११ उमेदवारी अर्ज आले असून त्यापैकी ९ राजकीय पक्षांतर्फे तर २ अपक्ष. निवडणूक निर्णय अधिकारी-७ यांच्याकडे ३५ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ३३ राजकीय पक्षांतर्फे तर २ अपक्ष. निवडणूक निर्णय अधिकारी-८ यांच्याकडे २६ अर्ज दाखल झाले असून त्यापैकी १९ उमेदवार राजकीय पक्षांतर्फे तर ७ अपक्ष.
निवडणूक निर्णय अधिकारी-९ यांच्याकडे २० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी १६ उमेदवारांनी राजकीय पक्षांतर्फे तर ४ उमेदवारांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरले आहेत. सोमवारी एकूण १९१ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी १५३ अर्ज विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून, तर ३८ अपक्षांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.



























































