
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी ऑक्टोबरमध्ये लग्न केल्याचे वृत्त होते. परंतु दोघांनीही मात्र अधिकृतपणे काहीही जाहीर केले नाही. रश्मिकाच्या बोटामध्ये दिसून येणारी अंगठीवरुन माध्यमांनी खूप सारे अंदाज बांधले होते. परंतु अखेर या दोघांच्या लग्नाची तारीख जाहीर झालेली आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात दोघेही बोहल्यावर चढणार असल्याचे वृत्त हिंदुस्थान टाइम्स या वृत्तपत्राने दिले आहे.
वृत्तानुसार, रश्मिका आणि विजय २६ फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकतील. हा महिना विशेषतः खास आहे, कारण हा व्हॅलेंटाईन डे आहे, जो प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. २६ फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये लग्नबंधनात अडकतील. एवढेच नाही तर दोघांनी कुठे कोणता सोहळा होईल याकरता जागाही ठरवली आहे. त्यांच्या साखरपुड्याप्रमाणेच, त्यांचा विवाह देखील खासगी असणार आहे. फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रमंडळींना या विवाहास आमंत्रण दिले जाणार आहे. उदयपूरमध्ये लग्न झाल्यानंतर स्वागत समारंभ हैद्राबाद येथे आयोजित करण्यात आलेले आहे.
जोडप्याने अधिकृतपणे त्यांच्या नात्याची कबुली दिली नसली तरी, विजय रश्मिकाच्या “द गर्लफ्रेंड” चित्रपटाच्या कार्यक्रमात तिच्या हाताचे चुंबन घेताना दिसला होता. विजय आणि रश्मिकाच्या वयात सात वर्षांचा फरक आहे. विजय हा रश्मिकापेक्षा सात वर्षांनी मोठा आहे. रश्मिका सध्या २९ वर्षांची आहे, तर विजय ३६ वर्षांचा आहे. वयात फरक असूनही, त्यांच्यात एकमेकांबद्दल प्रचंड प्रेम आणि आदर आहे, जो कोणत्याही नात्याला टिकवून ठेवण्यासाठी पुरेसा आहे.

























































