
भयपट बघणारा एक ठराविक प्रेक्षकवर्ग आपल्याकडे आजही आहे. भयपट प्रेमींसाठी आगामी वर्ष हे खास असणार आहे. 2026 हे वर्ष चित्रपट प्रेमींसाठी एका खास पद्धतीने सुरू होईल. पुढच्या वर्षी केवळ बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटच नाही तर हॉलिवूड चित्रपट देखील त्यांच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी अनेक रोमांचक चित्रपट प्रदर्शित करणार आहेत. आजही बाॅलिवूडपेक्षा हाॅलिवूड भयपटाचे फॅन्स जास्त आहेत. आगामी वर्षात हॉलिवूड भयपटांची रांगच लागणार आहे.
‘द प्लेग’ – या चित्रपटाची कथा वॉटर पोलो कॅम्पवर आधारित आहे. ही कथा एका 12 वर्षांच्या मुलाभोवती गुंफलेली आहे. जो कॅम्पमध्ये ‘द प्लेग’ मध्ये अडकतो. हा चित्रपट 2 जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
‘वी बरी द डेड’ – झोम्बी थीमवर हा सिनेमा आधारलेला आहे. ही कथा एका महिलेभोवती फिरते जी साथीच्या आजारानंतर तिच्या पतीच्या शोधात निघते. परंतु तिच्या पतीचा मृतदेह हा अचानक जिवंत होतो आणि कथानक एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचते. हा चित्रपट देखील 2 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
28 इयर्स लेटर: द बोन टेंपल– “28 इयर्स लॅटर” चा सिक्वेल, 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या हॉरर थ्रिलरमध्ये राल्फ फिएनेस, जॅक ओ’कॉनेल, अल्फी विल्यम्स, एरिन केलीमन, एम्मा लेर्ड आणि ची लुईस-पॅरी यांच्या भूमिका आहेत. रिलीजच्या तारखेबद्दल बोलायचे झाल्यास, हा चित्रपट 16 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.
रिटर्न टू द सायलेंट हिल – या प्रतिष्ठित हॉरर थ्रिलर चित्रपटाने भूतकाळात प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. आगामी चित्रपटात एक आकर्षक कथानक आहे, जिथे जेम्सला त्याच्या मृत पत्नीकडून एक रहस्यमय पत्र मिळते. त्यानंतर तो तिच्या शोधात सायलेंट हिलला परततो. हा चित्रपट 23 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
सायको किलर – हा हॉलिवूड हॉरर चित्रपट पाहून तुमचा थरकाप उडेल यात शंका नाही. गॅव्हिन पोलोन दिग्दर्शित या चित्रपटाचे दिग्दर्शन अँड्र्यू केविन वॉकर यांनी केले आहे. हा चित्रपट पोलिस अधिकारी जेन थॉर्न (जॉर्जिना कॅम्पबेल) यांच्यावर आधारित आहे. ज्या “सॅटॅनिक स्लॅशर” (जेम्स प्रेस्टन रॉजर्स) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका सिरीयल किलरला पकडण्याच्या मोहिमेवर आहेत ज्याने तिच्या राज्य पोलिस अधिकाऱ्याच्या पतीची हत्या केली. हा चित्रपट 20 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.



























































