तुझ्या तोंडावर लघवी करेन… यूपीमध्ये महिला पोलिसाची वाहनचालकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल

उत्तर प्रदेशातील वाहतूक कोंडीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये महिला पोलीस अधिकारी इतर प्रवाशांना शिवीगाळ करत धमकावताना दिसतेय. या महिला अधिकाऱ्याच्या अशा असभ्य वागण्यावरून इतर प्रवाशांमध्ये संतापाचा वातावरण आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे नेटकरी देखील या प्रकरणावर रोष व्यक्त करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडली. संध्याकाळची वेळ म्हटलं की रहदारीच्या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यामुळे प्रवाशांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. अशीच परिस्थिती 29 डिसेंबर रोजी मेरठमध्ये होती. संध्याकाळच्या सुमारास प्रचंड वाहतुक कोंडी झाली होती. बराच वेळ एकही गाडी जागची न हलल्यामुळे त्या वाहतुककोंडी अडकलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला राग अनावर झाला आणि त्यांनी कारबाहेर येऊन इतर प्रवाशांना शिवीगाळ करायला सुरूवात केली.

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे, ही महिला अधिकारी कारमधून उतरली आणि शेजारी असलेल्या कारमधील जोडप्यासोबत वाद घातला. एवढ्यावरच त्या थांबल्या नाही तर त्यांनी मला जर पुढे जायला जागा दिली नाही तर मी तुमच्या तोंडावर लघवी करेन.., अशी धमकी या महिला अधिकाऱ्यांने त्या जोडप्याला दिली. त्यामुळे वाद आणखी शिगेला गेला. यावेळी आजूबाजूच्या लोंकानी त्या महिलेचा व्हिडीओ काढला आणि सोशल मीडियावर शेअर केला.

दरम्यान या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. पोलिसांचे वागणे हे असभ्य आहे, त्यांच्यावर योग्यती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच या महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या गणवेशावरूनही प्रश्न उपस्थित केले आहेत.