
‘स्वच्छ शहर’ अशी ओळख असलेल्या मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये भागीरथपुरा भागात दूषित पाणी प्यायल्यामुळे सात जणांचा मृत्यू झाला तर 100 पेक्षा जास्त जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मध्य प्रदेश सरकारने महापालिकेच्या दोन अधिकाऱयांना तडकाफडकी निलंबित केले आहे.
इंदूरच्या महापौर पुष्यमित्र भार्गव यांनी घटनेची माहिती दिली. दूषित पाणी प्यायल्याने एकूण 116 पेक्षा जास्त लोकांची प्रकृती बिघडली. त्यातील 36 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याचे भार्गव यांनी सांगितले. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव प्रसाद हसानी यांनी सांगितले की, ‘दूषित पाणी प्यायल्यामुळे रुग्णांना उलटया आणि डिहायड्रेशनचा त्रास होत असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर भागीरथपुरामध्ये अनेक वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. अधिकाऱयांनी प्रयोगशाळेच्या चाचणीसाठी पाण्याचे नमुने गोळा केले आहेत. प्राथमिक चौकशीत असे दिसत आहे की ड्रेनेजचं पाणी पिण्याच्या पाण्याच्या पुरवठय़ात मिसळल्याची शक्यता आहे.’

























































