
हिंदुस्थान आणि श्रीलंकेत होणाऱया टी-20 वर्ल्ड कपसाठी अफगाणिस्तानने 15 सदस्यीय संघ जाहीर केला असून राशिद खानकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. उपकर्णधार म्हणून इब्राहिम झदरानची निवड करण्यात आली आहे. संघात फझलहक फारुकी, मुजीब उर रहमान, गुलबदिन नईब आणि नविन-उल-हक यांचा समावेश असून दुखापतीनंतर नविनचे पुनरागमन झाले आहे. अफगाणिस्तान वर्ल्ड कपपूर्वी यूएईत वेस्ट इंडीजविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. मागील वर्ल्ड कपमध्ये उपांत्य फेरी गाठलेल्या अफगाणिस्तानकडून यंदाही दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. अफगाणिस्तानचा संघ ः राशिद खान (कर्णधार), इब्राहिम झदरान (उपकर्णधार), रहमानुल्ला गुरबाज, मोहम्मद इशाक, सेदिकुल्लाह अतल, दरविश रसुली, शाहिदुल्लाह कमाल, अझमतुल्लाह ओमरझाई, गुलबदिन नईब, मोहम्मद नबी, नूर अहमद, मुजीब उर रहमान, नविन-उल-हक, फझलहक फारुकी, अब्दुल्ला अहमदझाई.






























































