ट्रेंड – हत्तीची जबरदस्त हेअरस्टाईल

प्राण्यांचे व्हिडीओ चेहऱ्यावर नेहमीच हसू आणतात. त्यांचे निरागस वागणं, चालणं, मजेशीर कृती पाहून छान वाटतं. एका हत्तीचा असाच एक व्हिडियो व्हायरल होत आहे. हत्तीने नकळत केलेली कृती सगळ्यांना पोट धरून हसायला भाग पाडत आहे. हत्तीने 2 ते 3 वेळा सोंडेने फक्त गवत डोक्यावर फेकले आणि ते नकळत नैसर्गिक हेअरस्टाईल केल्यासारखे दिसू लागले. ज्यामुळे सगळ्यांना हा व्हिडीओ बघून आश्चर्य वाटत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @oc_.alpha.sp या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.