एसटीच्या कामकाजात मराठी भाषा बंधनकारक

एसटी महामंडळाच्या ताफ्यातील शिवनेरी, शिवशाही गाडय़ांवर हिंदी भाषेत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यावर तीव्र आक्षेप घेण्यात आला होता. त्याची दखल घेत एसटी महामंडळाने आता संपूर्ण कार्यालयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर अनिवार्य केला आहे. बसगाडय़ा, बसस्थानके, आगारांमध्ये लिहिल्या जाणाऱया सर्व सूचना तसेच अंतर्गत फलक मातृभाषेतूनच लिहिण्याचे बंधनकारक केले आहे. तशा सक्त सूचना महामंडळाने जारी केल्या. मराठी एकीकरण समितीने ही बाब निदर्शनास आणून दिली होती.