
‘ही रझाकाराची औलाद, महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिराचा विकास करायचा आहे तर बाहेर कर ना, गाभाऱयाला कशाला हात लावायचा? त्यांनी ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला नगराध्यक्ष केले, त्यामुळे आता प्रसाद म्हणून ते ड्रग्जची पुडीही देतील!’ असे म्हणत माजी मंत्री तानाजी सावंत यांनी आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यावर जिव्हारी टीका केली.
मिंधे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या वतीने तालुक्यातील ढोकी येथील तेरणा साखर कारखान्याच्या मैदानावर विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना ‘खेकडा’फेम मंत्री तानाजी सावंत यांनी भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली.


































































