
सोशल मीडियावर व्हिडीओ, ब्लॉग बनवून, त्यावर लाखो रुपये कमावणाऱयांची संख्या वाढत आहे. रील्सद्वारे ते डान्स व अभिनय करणे, गाणी गाणे अशा कला सादर करीत असतात. हौशी कलाकारांचे प्रमाण खूप जास्त असते. सामान्य कुटुंबातील एक महिलेने गायलेला असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडीओ एका स्पर्धेतील असून महिला ‘ये पगला है’ हे गाणे गाताना गाताना दिसतेय. या महिलेचा आवाज अतिशय सुरेल आणि सुंदर असून तिच्या आवाजाने परीक्षकही मंत्रमुग्ध झाल्याचे पाहायला मिळत आहे. तिचा हा सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @sakhubai_l या अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत 20 लाखांहून अधिक ह्यूज आणि शेकडो कमेट्स आल्या आहेत.
































































