
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर सडकून टीका केली. देशाची मान झुकू देणार नाही म्हणणारे अमेरिकेपुढे सरेंडर झाले आहेत. एवढेच नाही तर गलवान खोऱ्यातील हिंदुस्थानी जवानांचे बलिदान विसरून चीनी कंपन्यांना गालीचे अंथरत आहेत, अशी खरपूस टीका खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.
मी देशाची मान झुकू देणार नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. मात्र आज याच्या उलट होत असल्याचे मल्लिकार्जुन खरगे यांनी दोन उदाहरणं देऊन स्पष्ट केले. पाच वर्षानंतर चीनी कंपन्यांवरील बंदी हटवण्यात येणार आहे. गलवानमध्ये हिंदुस्थानी जवानांनी जे बलिदान दिले, त्याचा अपमान मोदींनी चीनला ‘क्लीन चीट’ देऊन केला होता. आता चीनी कंपन्यांसाठी लाल गालीचा अंथरला जात आहे. त्यांच्या लाल डोळ्यांमध्ये चीनचा लाल रंग किती भिनलाय हेच ते दाखवत आहेत, अशी जहरी टीका खरगे यांनी मोदींवर केली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रोज हिंदुस्थानच्या रशियाकडून होणाऱ्या तेल आयातीवर टिप्पणी करत आहेत. पण पंतप्रधान मोदी गप्प असून आपली नजर हटवत आहेत. ‘सर’ म्हणणेही आता सरेंडर केल्यासारखे वाटतेय, अशी टीका खरगे यांनी केली.
आमच्यासाठी परराष्ट्र धोरण म्हणजे राष्ट्रीय हित सर्वोपरि असले पाहिजे. परंतु मोदी सरकारने अलिप्तता आणि धोरणात्मक स्वायत्ततेच्या आमच्या परराष्ट्र धोरणाला धक्का दिला आहे. मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण जंगली लंबकाप्रमाणे असून कधी इकडे, तर कधी तिकडे झुलत असते आणि याचा तोटा हिंदुस्थानी जनतेला सहन करावा लागतो, असेही खरगे म्हणाले.
“मैं देश नहीं झुकने दूँगा”
आज जो हो रहा है, वो बिलकुल उसका उल्टा है। दो ताज़ा उदाहरण —
1️⃣ 5 साल से लगा चीनी कंपनियों पर बैन हटाया जा रहा है।
गलवान में भारतीय वीर सैनिकों ने जो आहुति दी, उनके बलिदान का अपमान तो मोदी जी चीन को CLEAN CHIT थमाकर किया था।
अब चीनी कंपनियों के…
— Mallikarjun Kharge (@kharge) January 9, 2026




























































