
मोड आलेली मटकी म्हणजे प्रथिनांचा खजिना. मोठय़ा प्रमाणात प्रथिने आणि लोह अशा मटकीत असते.
सर्वप्रथम मटकी 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. त्यानंतर रात्री मटकी पाण्यात भिजत ठेवा. सुमारे 8 ते 10 तास मटकी पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर एका स्वच्छ सुती कापडात नीट बांधून घ्या. कापडात बांधलेली मटकी ऊबदार ठिकाणी ठेवा. गॅसच्या जवळ, स्वयंपाकघरातील कपाटात, फ्रिजच्या बाहेर किंवा सूर्यप्रकाश येत असेल त्या खिडकीजवळ मटकी ठेवा. काही तासांनी मटकीला छान मोड आलेले दिसतील.































































