
मुंबईतील प्रतिष्ठत इस्लाम जिमखाना येथे सियारामच्या 12 व्या दृष्टिबाधित क्रिकेट स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ झाला. सर्वसमावेशक क्रीडेला चालना देणारी ही स्पर्धा म्हणजे केवळ सामने नव्हेत, तर दृष्टिबाधित खेळाडूंच्या जिद्द, आत्मविश्वास आणि क्षमतेचा उत्सव ठरत आहे.
उद्घाटना दिवशी खेळवण्यात आलेला पहिला सामना चुरशीचा आणि थरारक ठरला. देशाच्या विविध भागांतून आलेल्या दृष्टिबाधित क्रिकेटपटूंनी उत्पृष्ट फलंदाजी, अचूक गोलंदाजी आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण करत प्रेक्षकांची दाद मिळवली. प्रत्येक चेंडूवर दिसणारी जिद्द आणि खेळभावना संपूर्ण स्पर्धेची उंची अधोरेखित करणारी ठरली.
राज्यात निवडणूक प्रचार सुरू असतानाही या स्पर्धेला माध्यमांचा मोठा प्रतिसाद लाभला. प्रिंट, डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींनी स्पर्धेचे उत्साहात कव्हरेज केले. त्यामुळे दृष्टिबाधित क्रिकेटला सकारात्मक सामाजिक बदलाचे प्रभावी माध्यम म्हणून मिळत असलेली ओळख अधिक ठळक झाली आहे. यावेळी बोलताना सियारामचे सीएमडी रमेश पोद्दार यांनी दृष्टिबाधित क्रिकेट हा केवळ खेळ नसून तो आत्मविश्वास आणि आत्मसन्मान निर्माण करणारा एक चळवळीसारखा प्रवास असल्याचे म्हणाले.




























































