हेमा मालिनी यांना व्हीआयपी ट्रीटमेंट

जुहू येथील मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांनी रांगा लावून मतदान केले. तास तासभर लोक मतदान केंद्रावर उभे होते. मात्र, भाजपच्या खासदार, अभिनेत्री हेमा मालिनी यांना तिथे व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली. अधिकाऱ्यांनी हेमा मालिनी यांना रांगेशिवाय आत सोडले. त्याही बिनदिक्कत आत जाऊन मतदान करून आल्या. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा पारा चढला. त्याने सर्वांसमोरच हेमा मालिनी यांना सुनावले. त्यामुळे हेमा मालिनी यांचा चेहरा पडला. त्यांनी कार्यकर्त्याला पुढे करून पळ काढला.