
> मंगेश मोरे
निवडणूक आयोगाची कार्यपद्धती मतदानापाठोपाठ मतमोजणीच्या दिवशीही वादात सापडली आहे. मतमोजणीच्या आकडेवारीबाबत पारदर्शकता ठेवण्यात राज्य निवडणूक आयोग अपयशी ठरल्याचे स्पष्ट होत आहे. गोरेगाव पश्चिमेकडील उन्नतनगर मुंबई पब्लिक स्कूल येथील मतमोजणी केंद्राबाहेरील मतमोजणी दर्शवणारी निवडणूक आयोगाची उपकरणे निष्क्रिय अवस्थेत आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या पदरात पडलेल्या आकडेवारीबाबत साशंकता निर्माण करणारी परिस्थिती आहे. निवडणूक आयोग मतांच्या आकडेवारीचा तपशील प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या उपकरणांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.
खालील लिंकवर क्लिक करा आणि वाचा अपडेट…
मतमोजणी केंद्रावर प्रसारमाध्यमांचा कक्ष असून तेथे एक टीव्ही आणि मतमोजणीची माहिती देणारा स्वतंत्र संच उभा करण्यात आला आहे. मात्र, कित्येक तासांपासून तो संच केवळ नावालाच उभा करून ठेवल्याचे दिसून येत आहे. याव्यतिरिक्त सीसीटीव्हीचे फुटेज दाखवणारा टीव्हीदेखील योग्यरीत्या कार्यान्वित नाही. मतमोजणीचे फुटेज स्पष्टपणे दाखवले जात नसल्यामुळे निवडणूक आयोगाचा कारभार वादात सापडला आहे.





























































