
वरळीमध्ये शिवसेनेची मशाल अधिक तेजाने उजळली आहे. शिवसेनेच्या हेमांगी वरळीकर, निशिकांत शिंदे, विजय भणगे, पद्मजा चेंबूरकर, अबोली खाडये, किशोरी पेडणेकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. धनशक्तीच्या जोरावर निवडणुकीच्या मैदानात उतरलेले शिंदे गटाचे समाधान सरवणकर यांना निशिकांत शिंदे यांना जोरदार धक्का दिला
आहे.
शिवसेना आमदार आणि नेते आदित्य ठाकरे यांचा बालेकिल्ला असलेल्या वरळीत सात वॉर्डांपैकी सहा वॉर्डात शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली आहे. वरळीमध्ये आदित्य ठाकरे व मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी शाखाशाखांना भेटी दिल्या होत्या. मोठी रॅली काढली होती. आदित्य ठाकरे यांच्या सभांनाही मतदारांनी जोरदार प्रतिसाद दिला होता. शिवसेना आमदार सुनील शिंदे यांचे भाऊ निशिकांत शिंदे यांना मतदारांनी साथ देत भरघोस मतांनी विजयी केले.
माजी महापौर विजयी
या वॉर्डामधून शिवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि माजी बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांच्या पत्नी पद्मजा चेंबूरकर रिंगणात होत्या. या उमेदवारांच्या गळ्यात मतदारांनी विजयाची माळ घातली आहे.
दादरचा शिवसेनेचा गड बुलंद राहिला! दादरमध्ये गद्दारांना पाणी पाजले, धारावीकरांची मशालीला साथ


























































