
नासाने पहिल्यांदाच वैद्यकीय समस्येमुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (आयएसएस) चार अंतराळवीरांना वेळेआधीच पृथ्वीवर परत बोलावले आहे. यापैकी एका अंतराळवीराला डॉक्टरांच्या देखभालीची गरज होती.
चारही अंतराळवीर बुधवारी स्पेसएक्सच्या पॅप्सूलमधून आयएसएसवरून रवाना झाले. यात अमेरिका, रशिया आणि जपानचे अंतराळवीर समाविष्ट आहेत. या मोहिमेत नासाच्या जेना कार्डमन, माईक फिंके, जपानचे किमिया यूई आणि रशियाचे ओलेग प्लाटोनोव्ह यांचा समावेश होता. या सर्वांना ऑगस्ट 2025 मध्ये आयएसएसवर पाठवण्यात आले होते आणि त्यांना फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत परत यायचे होते. 7 जानेवारी रोजी नासाने अचानक कार्डमन आणि फिंके यांचा स्पेसवॉक रद्द केला. नंतर क्रूच्या लवकर परत येण्याची घोषणा केली. मात्र गोपनीयतेचे कारण देत त्यांनी कोणतीही अतिरिक्त माहिती दिली नाही.































































