मंगळवारपासून दादर, अंधेरी, भांडुपमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा

मुंबईत मंगळवार, 20 जानेवारीपासून गुरुवार, 22 जानेवारीपर्यंत जलवाहिनी जोडणीच्या कामामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. याचा परिणाम जी/उत्तर दादर, के/पूर्व अंधेरी, एस भांडुप, एच/पूर्व वांद्रे आणि एन विभाग घाटकोपरमध्ये  काही भागात पाणीपुरवठा बंद, काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून पाणीपुरवठय़ाच्या वेळेतही बदल होणार आहे.

एमएमआरडीएच्या ‘मेट्रो लाईन-7 अ’ प्रकल्पाच्या कामासाठी 2 हजार 400 मिलीमीटर व्यासाच्या अप्पर वैतरणा मुख्य जलवाहिनीचा काही भाग वळविण्यात आला आहे. या वळविण्यात आलेल्या भागाचे छेद-जोडणी (क्रॉस कनेक्शन) चे काम के पूर्व विभागात पालिकेमार्फत करण्यात येणार आहे. हे काम 20 जानेवारी सकाळी 9 वाजेपासून 22 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत (एपूण 44 तास) सुरू राहणार आहे. त्यामुळे रहिवाशांनी पाण्याचा साठा करून ठेवावा आणि पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.