
मुंबईसह राज्यातल्या तेवीस महानगर पालिकांवर सत्तास्थापनेची भाजपने तयारी सुरू केली आहे. पण महापौर पदाच्या आरक्षणाच्या लॉटरीला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळे आता येत्या बुधवारपर्यंत घाईगडबडीने महापौर पदाची लॉटरी काढण्याच्या नगरविकास विभागाच्या हालचाली सुरू आहेत.
महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल लागल्यावर दोन आठवडय़ांत महापौर नियुक्त करावा लागतो. आता महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. पण अद्याप महापौर पदाच्या आरक्षणाची लॉटरी काढण्यात आलेली नाही. आतापर्यंत महापौर पदाची लॉटरी चक्राकार पद्धतीने काढण्यात येत होती. पण या वर्षी वॉर्ड आरक्षणाच्या धर्तीवर नव्याने लॉटरी काढण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
- येत्या बुधवारपर्यंत नगरविकास विभागाच्यावतीने लॉटरी काढण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे 31 जानेवारीपूर्वी मुंबई महानगर पालिकेवर महापौर नियुक्त झालेला असेल असे सांगण्यात येते.































































