
भाजपवाले फार कलाकार आहेत. त्यांनी पहिली महाविकास आघाडी संपवली. आता शिंदेचा आणि अजितदादाचा काटा काढला. मात्र मराठा, मुस्लिम आणि दलित एक झाल्यास ते भाजपला चिरडून टाकतील, असा हल्लाबोल मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केला. परळीतील मिरवट येथे आज ते माध्यमांशी बोलत होते.
महापालिका निवडणुकीतील भाजपच्या यशाकर भाष्य करताना त्यांनी अजित पकारांवर टीका केली. भाजपने बघायला काही ठेवलंच नाही. भाजपवाले मोठे कलाकार आहेत. अजितदादा पण असे लोक सांभाळत असल्यामुळे लोक त्यांच्यापासून दूर जात असल्याचे ते म्हणाले.































































