सोन्याची तस्करी करणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला अटक

Bangladeshi National and Airport Staff Arrested in Mumbai for Gold Smuggling

सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी बांगलादेशी नागरिकासह विमानतळावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला सीमा शुल्क विभागाने अटक केली आहे. त्या दोघांकडून 1590 ग्रॅम सोने जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे 2 कोटी 15 लाख रुपये इतकी आहे.

सोने तस्करीचे प्रकार होऊ नये याची खबरदारी सीमा शुल्क विभागाने घेतली आहे. शनिवारी एका खासगी विमानाने बांगलादेशी नागरिक छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्याने सोन्याची भुकटी असलेली चार अंडाकृती पाकिटे विमानतळावरील कर्मचाऱ्याला देत असताना पकडले.